Uttar Pradesh: आग्रा येथे पतीने पत्नीचे लावले अश्लील पोस्टर, कारवाई न झाल्यास महिलेने दिला आत्महत्येचा इशारा (Watch Video)

पतीने स्वतःच्या पत्नीचे अश्लील पोस्टर लावले. या अश्लील पोस्टरवर महिलेचा नंबर लिहिला आहे. यानंतर पीडित महिलेने या प्रकरणाची तक्रार डीसीपीकडे केली आहे.

उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आग्रामध्ये अश्लील पोस्टर लावण्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. पतीने स्वतःच्या पत्नीचे अश्लील पोस्टर लावले. या अश्लील पोस्टरवर महिलेचा नंबर लिहिला आहे. यानंतर पीडित महिलेने या प्रकरणाची तक्रार डीसीपीकडे केली आहे. त्याचबरोबर कारवाई न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही महिलेने दिला आहे. गेल्या 6 वर्षांपासून महिला आणि तिच्या पतीमध्ये वाद सुरू होता. हे संपूर्ण प्रकरण पोलीस ठाणे कमला नगर परिसरातील आहे.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now