Greater Noida Wall Collapsed: मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळली, तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू, उत्तर प्रदेशातील घटना
दिल्ली- एनसीआरच्या भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. या मुसळधार पावसात उत्तर प्रदेशातील नोएडा येथील दादरी भागात एक बांधकाम सुरु असलेल्या घराची भिंती कोसळली आहे.
Greater Noida Wall Collapsed: दिल्ली- एनसीआरच्या भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. या मुसळधार पावसात उत्तर प्रदेशातील नोएडा येथील दादरी भागात एक बांधकाम सुरु असलेल्या घराची भिंती कोसळली आहे. भिंती कोसळल्याने तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. ही घटना दादरी तहसीलच्या हद्दीतील खोडना कलान गावात घडली आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलिस आणि बचावकार्य सुरु झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम सुरु असलेल्या घराच्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली एकुण आठ मुले अडकली होती.सर्वांना बाहेर काढण्यात आले तर डॉक्टरांनी तीन जणांना मृत घोषित केले आहे. बाकीच्या मुलांवर उपचार सुरु आहे. (हेही वाचा- दिल्लीतील वसंत विहार परिसरात बांधकाम ठिकाणी भिंत कोसळली, एकाचा मृतदेह सापडला)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)