Hyderabad Rains: हैद्राबादमध्ये मुसळधार पाऊस, पाण्याच्या प्रवाहात तरुण बाईकसह गेला वाहून (Watch Video)
हैद्राबादमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाली आहे. युसुफगुडा येथील एका दुचाकीसह एक तरुण पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला. यावेळी दोन जणांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता तेही काही अंतरावर वाहून गेले.
Hyderabad Rains: हैद्राबादमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाली आहे. युसुफगुडा येथे रस्त्यावर एका दुचाकीसह तरुण पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला. यावेळी दोन जणांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता परंतू तेही काही अंतरावर वाहून गेले. सुदैवाने सर्वजण सुखरूप बचावले आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हैदराबादमध्ये मुसळधार पावसानंतर 20 ऑगस्ट रोजी सकाळी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात रस्त्यांवर पाणी साचले आहे. (हेही वाचा- दिल्लीत मुसळधार पाऊस, रस्त्यावर साचलेल्या पाण्यात रिक्षा बुडाली (Watch Video)
पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे दुचाकीसह तरुण वाहून गेला (पाहा व्हिडिओ)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)