Haryana Shocker: हरियाणातील टिकली गावात 2 बिबट्यांच्या हल्ल्यात 10 जनावरांचा मृत्यू (Watch Video)

त्या बिबट्यांनी तब्बल 10 गायींवर हल्ला केला आहे. त्यात त्या सर्व गायींचा मृत्यू झाला आहे.

Haryana Shocker: हरियाणातील गुरुग्राम इथल्या टिकली गावात रात्री दोन बिबटे आढळले. एका गोठ्यात शिरताना ते दिसले. त्या दोन बिबट्यांनी तब्बल 10 जनांवरांवर हल्ला केला आहे. त्यात त्या सर्व जनावरांचा मृत्यू झाला आहे. एएनआयने त्याबाबतचे वृत्त दिले. वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जनावरांच्या मालकाला गोठ्याच्या भिंतीची उंची वाढवून जाळी लावण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, शेतकऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी गावात केटरिंग पिंजरे लावण्याची विनंती केली आहे. त्यावर येथे दोन पिंजरे लावण्यात येत आहेत. गावात बिबट्या पुन्हा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

व्हिडीओ पहा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)