Karnataka: आजीला सलाम! हृदय शस्त्रक्रियेनंतरही ती रुळावर धावत राहिली, अपघातापूर्वी लाल कपडा दाखवून थांबवली ट्रेन
त्यानंतर ती धावत घरात गेली आणि एक लाल कपडा आणला, जो तिने लोको पायलटला दाखवला.
कर्नाटकात एका 70 वर्षीय महिलेच्या बुद्धीमुळे मोठा रेल्वे अपघात टळला. या वृद्ध महिलेने शेकडो रेल्वे प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. मंगळुरूहून मुंबईला जाणारी ट्रेन लाल कपडा दाखवून वृद्ध महिलेने थांबवली, त्यानंतर मोठा रेल्वे अपघात टळला. मंगळुरूच्या मंदारा येथील चंद्रावती या 70 वर्षीय वृद्ध महिलेने 21 मार्च रोजी दुपारी 2 वाजता पडिल ते जोकट्टे दरम्यान रेल्वे ट्रॅकवर एक झाड पडलेले पाहिले. त्यानंतर ती धावत घरात गेली आणि एक लाल कपडा आणला, जो तिने लोको पायलटला दाखवला. मत्स्यगंधा एक्स्प्रेस मंगळुरूहून मुंबईला जाणारी मत्स्यगंधा एक्स्प्रेस त्याच मार्गावरून जाणार हे चंद्रावतीला माहीत होते. यानंतर लोको पायलटला लाल कपडा दिसताच त्याला येणारा धोका लक्षात आला आणि त्याने ट्रेनचा वेग कमी केला. चंद्रावतीचा नुकताच रेल्वे पोलिसांनी तिच्या या धाडसी कृत्याबद्दल गौरव केला ज्यामुळे मोठा अपघात टळला.