Gujarat Accident News: सापुतारा रोडवर ट्रक कारवर उलटल्याने चार जणांचा मृत्यू, एक जखमी

गुजरात येथील ट्रक कारवर उलटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत चार जणांनी आपला जीव गमावला आहे.

Gujarat Accident News: सापुतारा रोडवर ट्रक कारवर उलटल्याने चार जणांचा मृत्यू, एक जखमी
Gujarat Accident

Gujarat Accident News: गुजरात येथील ट्रक कारवर उलटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत चार जणांनी आपला जीव गमावला आहे. तर एक जखमी झाला आहे. गुजरात येथील डांग जिल्ह्यातील सापुतारा रोडवर हा अपघात झाला आहे. ब्रेक फेल झाल्याने चालकाचे गाडीवर नियत्रंण सुटल्याने हा अपघात झाला अशी माहिती समोर आली आहे. भीषण अपघातात, एक पुरुष, दोन महिला आणि एक तीन वर्षाच्या मुलाचे मृत्यू झाले आहे. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी येताच त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 05, 2024 03:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).