Centre Approve Nasal Vaccine: भारत सरकारने दिली अनुनासिक लसीला मान्यता; प्रथम खाजगी रुग्णालयांमध्ये होणार उपलब्ध
भारत सरकारने अनुनासिक लसीला मान्यता दिली आहे. आजपासून COVID19 लसीकरण कार्यक्रमात त्याचा समावेश केला जाणार असल्याचं अधिकृत स्रोताने सांगितलं आहे.
Centre Approve Nasal Vaccine: भारत सरकारने अनुनासिक लसीला मान्यता दिली आहे. हे हेटरोलॉगस बूस्टर म्हणून वापरले जाणार असून खाजगी रुग्णालयांमध्ये प्रथम उपलब्ध होईल. आजपासून COVID19 लसीकरण कार्यक्रमात त्याचा समावेश केला जाणार असल्याचं अधिकृत स्रोताने सांगितलं आहे. चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चीनमधील परिस्थिती पाहता यावेळी भारत सरकार आधीच अलर्ट मोडवर आले आहे. बुधवारपासून केंद्र सरकारने कोरोनाबाबत अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. दुसरीकडे, गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीही नवीन अनुनासिक कोरोना लसीबाबत माहिती दिली. मनसुख मांडविया यांनी राज्यसभेत सांगितले की, आज तज्ञांच्या समितीनेही नाकातील लसीला मंजुरी दिली. (हेही वाचा - Covid-19 BF.7 Variant: कोरोनाच्या नव्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर IMA ने जारी केली अॅडव्हायजरी; देशवासियांना दिला 'हा' सल्ला)
Govt of India approves Nasal vaccine. It will be used as a heterologous booster & will be available first in private hospitals. It will be included in #COVID19 vaccination program from today: Official Sources pic.twitter.com/eaxVoX2Hp9
— ANI (@ANI) December 23, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 23, 2022 10:55 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

