UP Train Derailment: उत्तर प्रदेशमधील पंभीपूरमध्ये 2 मालगाड्या रुळावरून घसरल्या; आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल (Video)
फत्तेपूर खागा येथील पंभीपूर येथे दोन मालगाड्या रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. या अपघातात अद्याप कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. अधिकारी अपघाताचे कारण तपासत आहेत.
UP Train Derailment: फत्तेपूर खागा (Fatehpur Khaga) येथील पंभीपूर येथे मंगळवारी सकाळी मालगाड्या रुळावरून घसरल्याची (Train Derailment) घटना घडली. आपत्कालीन पथके घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत. 2 मालगाड्या रुळांवरून घसरल्या. अधिकारी सध्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत आणि मालगाड्या रुळावरून घसरण्याचे कारण तपासत आहेत. अपघाताच्या दृश्यांशिवाय, आत्तापर्यंत कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र, उत्तप्रदेशमध्ये रेल्वे रूळांवरून घसल्याच्या (Train Accident) अनेक घटना घडल्या आहेत. दरम्यान, अशा अपघातांची संख्या इतर वर्षांच्या तुलनेत 2024 मध्ये जास्त होती. (Gujarat Train Derailment: दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेस सुरतमधील किम स्टेशनवर रुळावरून घसरली, कोणतीही दुखापत नाही (See Pics and Video))
उत्तर प्रदेशमधील पंभीपूरमध्ये मालगाड्या रुळावरून घसरल्या
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)