KCR Discharged From Hyderabad Hospital: तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेनंतर 7 दिवसांनी डिस्चार्ज, पहा व्हिडिओ

त्यांना सोमाजीगुडा येथील यशोदा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. जेथे डॉक्टरांना डाव्या नितंबाच्या हाडात फ्रॅक्चर आढळून आले. त्यानंतर चंद्रशेखर यांच्यावर हिप बदलण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली.

KCR Discharged From Hyderabad Hospital (PC -X/@KP_Aashish)

KCR Discharged From Hyderabad Hospital: तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि बीआरएसचे अध्यक्ष के चंद्रशेखर राव (K Chandrashekhar Rao) यांना हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेनंतर (Hip Replacement Surgery) 7 दिवसांनी हैदराबाद रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सुमारे सहा ते आठ आठवडे उपचारासाठी त्यांना आता बंजारा हिल्स येथील नंदीनगर येथील निवासस्थानी हलवण्यात आले आहे. चंद्रशेखर राव हे शुक्रवारी, 7 डिसेंबरच्या पहाटे एरवेली येथील त्यांच्या फार्महाऊसमधील बाथरूममध्ये घसरले आणि पडले. त्यांना सोमाजीगुडा येथील यशोदा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. जेथे डॉक्टरांना डाव्या नितंबाच्या हाडात फ्रॅक्चर आढळून आले. त्यानंतर चंद्रशेखर यांच्यावर हिप बदलण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांना पुढील सहा ते आठ आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये KCR हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसत आहेत. वैद्यकीय पथकाने चंद्रशेखर राव यांची स्थिर प्रकृती स्थिर असल्याच सांगत शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचा अहवाल दिला आहे. (हेही वाचा - Rajasthan CM Oath Ceremony: Bhajan Lal Sharma घेणार राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ; जयपूरमध्ये पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत पार पडणार शपथविधी)