Former MP CM Shivraj Singh: शिवराज चौहान यांना भेटल्यावर महिलांना रडू आवरेना, भावूक व्हिडिओ व्हायरल

छत्तीसगडनंतर आता मध्य प्रदेशातही नवा मुख्यमंत्री जाहीर केला आहे. तर मध्य प्रदेश राज्याचे नवे मुख्यमंत्रीपद मोहन यादव यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Former MP CM Shivraj Singh PC twitter

Former MP CM Shivraj Singh: छत्तीसगडनंतर आता मध्य प्रदेशातही नवा मुख्यमंत्री जाहीर केला आहे. तर मध्य प्रदेश राज्याचे नवे मुख्यमंत्रीपद मोहन यादव यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.  भाजपने शिवराज सिंह यांच्याऐवजी मोहन यादव यांना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री करण्याची घोषणा केली आहे.दरम्यान माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी राजीनामा दिल्यानंतर काही महिला त्यांना भेटण्यासाठी आल्या. यावेळी सर्व महिला भावूक होऊन रडू लागल्या. शिवराज यांना मिठी मारून रडू लागल्या. यावेळी शिवराज चौहन भावूक होऊन महिलांची समजूत काढू लागल्या. मध्य प्रदेश राज्यातील नागरिकांनी तुम्हाला वोट दिला. आम्ही तुमची साथ सोडणार नाही असा आक्रोश करत महिला रडत होत्या.या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यंदा भाजपने दणदणीत यश मिळवला आहे.  शिवराज यांनी राज्यपाल मंगूभाई पटेल यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. यानंतर मोहन यादव यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेची शपथ घेतली.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement