Lok Sabha Elections 2024: माजी भारतीय क्रिकेट पटू गौतम गंभीर यांनी दिल्लीत बजावला मतदानाचा हक्क, पाहा व्हिडिओ

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि भारतीय जनता पक्षाचे पूर्व दिल्लीचे खासदाक गौतम गंभीर यांनी लोकसभा निवडणूकीच्या २०२४ च्या सहाव्या टप्प्यात दिल्लीत मतदान केले

Gautam Gambhir PC ANI

Lok Sabha Elections 2024: माजी भारतीय क्रिकेटपटू आणि भारतीय जनता पक्षाचे पूर्व दिल्लीचे खासदाक गौतम गंभीर यांनी लोकसभा निवडणूकीच्या २०२४ च्या सहाव्या टप्प्यात दिल्लीत मतदान केले. एएनआय या वृत्तसंस्थेने त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. गौतम गंभीर सद्या आयपीएल २०२४मध्ये कोलकत्ता नाईट रायडर्सचा मेंटर आहे. मतदान केल्यानंतर गौतम गंभीरने मतदारांना आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, प्रत्येकाने बाहेर पडून जास्तीत जास्त मतदान केले पाहिजे.  हीच आमची शक्ती आहे, हीच आमची लोकशाही आहे आणि लोकशाही आणखी मजबूत करणे आहे." लोकांनी बाहेर पडणे आणि मोठ्या संख्येने मतदान करणे महत्वाचे आहे." गेल्या 10 वर्षात सरकारने ज्या प्रकारे काम केले आहे, होय, त्यांनी विकासासाठी काम केले आहे, देश पुढे गेला आहे आणि आशा आहे की लोकांना याची जाणीव होईल आणि लोक आज तेच करतील, विशेषत: दिल्लीचे लोक. (हेही वाचा- गांधी परिवाराने बजावला मतदानाचा हक्क; राहुल गांधी यांचा मतदानानंतर सोनियांसोबत सेल्फी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement