Lok Sabha Elections 2024: माजी भारतीय क्रिकेट पटू गौतम गंभीर यांनी दिल्लीत बजावला मतदानाचा हक्क, पाहा व्हिडिओ
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि भारतीय जनता पक्षाचे पूर्व दिल्लीचे खासदाक गौतम गंभीर यांनी लोकसभा निवडणूकीच्या २०२४ च्या सहाव्या टप्प्यात दिल्लीत मतदान केले
Lok Sabha Elections 2024: माजी भारतीय क्रिकेटपटू आणि भारतीय जनता पक्षाचे पूर्व दिल्लीचे खासदाक गौतम गंभीर यांनी लोकसभा निवडणूकीच्या २०२४ च्या सहाव्या टप्प्यात दिल्लीत मतदान केले. एएनआय या वृत्तसंस्थेने त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. गौतम गंभीर सद्या आयपीएल २०२४मध्ये कोलकत्ता नाईट रायडर्सचा मेंटर आहे. मतदान केल्यानंतर गौतम गंभीरने मतदारांना आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, प्रत्येकाने बाहेर पडून जास्तीत जास्त मतदान केले पाहिजे. हीच आमची शक्ती आहे, हीच आमची लोकशाही आहे आणि लोकशाही आणखी मजबूत करणे आहे." लोकांनी बाहेर पडणे आणि मोठ्या संख्येने मतदान करणे महत्वाचे आहे." गेल्या 10 वर्षात सरकारने ज्या प्रकारे काम केले आहे, होय, त्यांनी विकासासाठी काम केले आहे, देश पुढे गेला आहे आणि आशा आहे की लोकांना याची जाणीव होईल आणि लोक आज तेच करतील, विशेषत: दिल्लीचे लोक. (हेही वाचा- गांधी परिवाराने बजावला मतदानाचा हक्क; राहुल गांधी यांचा मतदानानंतर सोनियांसोबत सेल्फी)
#WATCH | BJP East Delhi MP and former India Cricketer Gautam Gambhir casts his vote for the sixth phase of #LokSabhaElections2024 at a polling station in Delhi. pic.twitter.com/1dNMGyCoUq
— ANI (@ANI) May 25, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 25, 2024 11:41 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

