Bihar Accident: माजी मुख्यमंत्री तेजेस्वी यादव यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात, चालकाचा मृत्यू, अनेक जखमी

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव यांच्या ताफ्यातील एका वाहनाचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Belauri Accident PC Twitter

Bihar Accident:  बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव यांच्या ताफ्यातील एका वाहनाचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या अपघातात वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. 6 पोलिस कर्मचारी जखमी झाले. तर दुसऱ्या वाहनातील चार लोक जखमी झाले आहे. मोहम्मद हलीम असं मृत चालकाचे नाव आहे. जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पूर्णियातील बिलौरी पॅनोरमा हाईटजवळ हा अपघात झाला. तेजस्वी यादव यांच्या जनविश्वास यात्रेच्या ताफ्यातील कारचे नियंत्रण सुटले. (हेही वाचा- तेलंगणाच्या सिद्धीपेट जिल्ह्यात भीषण रस्ता अपघात)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement