Tamil Nadu: मदुराई येथील संथाना मरियमम्न मंदिराच्या वार्षिक उत्सवादरम्यान आग; शेड, दुकाने आणि वाहने जळून खाक
वार्षिक मरियम्मन मंदिर उत्सव एक आठवडा चालतो. ज्यामध्ये शेजारील गावातील लोक सहभागी होण्यासाठी येतात आणि ते भव्य पद्धतीने हा उत्सव साजरा करतात. त्यामुळे उत्सवाला येणाऱ्या हजारो भाविकांना राहण्यासाठी मंदिराभोवती तात्पुरते शेड बांधण्यात आले होते. या शेडला काल आग लागली.
Tamil Nadu: मदुराई येथील संथाना मरियमम्न मंदिराच्या वार्षिक उत्सवादरम्यान शुक्रवारी आग लागली. आगीत तात्पुरते शेड, दुकाने आणि वाहने जळून खाक झाली. फटाके फोडल्याने ही आग लागली. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यासंदर्भात अग्निशमन विभागाने माहिती दिली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)