Delhi Fire: दिल्लीतील रोहिणी येथील अपार्टमेंटमध्ये अग्नितांडव, दोन जण जखमी

आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली.

Delhi Rohini Apartment Fire PC Twwiter

Delhi Fire: दिल्लीतील रोहणी येथील ड्युप्लेस अपार्टमेंटमध्ये शनिवारी सकाळी आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. आग सकाळी 6.05 ला लागली. आगीची माहिती मिळताच, तात्काळ घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाले. आगीच्या या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन तासांनंतर आग विझवण्यात आली अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आग कश्याने लागली हे अद्याप अस्पष्ट आहे.   (हेही वाचा- मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर वडगाव जवळ एका खाजगी बसला आग)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif