Fire At Mahakumbh in Prayagraj: प्रयागराज महाकुंभमेळा परिसरात आग लागल्याची माहिती समोर येत आहे. महाकुंभमेळा परिसरातील शास्त्री ब्रिज सेक्टर-19 कॅम्पमध्ये भीषण आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. स्वयंपाक करताना सिलेंडरमध्ये स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे, त्यानंतर आग संपूर्ण परिसरात पसरली. ही आग इतकी भीषण आहे की आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात काळ्या धुराचे लोट पसरले आहेत. तसेच, अग्निशमन दलाच्या पथकाने आजूबाजूचा संपूर्ण परिसर रिकामा केला आहे.
प्रयागराज येथील महाकुंभमेळा परिसरात आग -
Fire breaks out at a tent in Maha Kumbh
Read @ANI Story | https://t.co/qKOeY90MTg
#Fire #Mahakumbh #Prayagraj #UttarPradesh pic.twitter.com/uzQatllHLL
— ANI Digital (@ani_digital) January 19, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)