Karnataka Fire: शिवमोगा येथे कार शोरुममध्ये अग्नितांडव, सहा कार जळून खाक

कर्नाटकातील शिवमोगा येथील एका कार शोरुमला शुक्रवारी रात्री उशिरा भीषण आग लागली.

Showroom Fire in Karnataka PC TWitter

Karnataka Fire: कर्नाटकातील शिवमोगा येथील एका कार शोरुमला शुक्रवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. या आगीत सहा कार जळून जळून गेल्या आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आग लागल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आगीची माहिती जिल्हा अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. माहितीनुसार, ही घटना रात्री दहाच्या सुमारास घडली. माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि पथक घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्याचे काम सुरु केले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement