IPL Auction 2025 Live

Delhi Fire: दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये भीषण आग, 100 हून अधिक झोपडपट्ट्या जळून खाक; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

आगीत 100 हून अधिक झोपडपट्ट्या जळून खाक झाल्याची माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन डझनहून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Delhi Fire (PC - ANI/Twitter)

Delhi Fire: दिल्लीतील जहांगीरपुरी भागातील के-ब्लॉकमध्ये असलेल्या झोपडपट्टीला रविवारी सकाळी 10 वाजता अचानक आग लागली. आगीत 100 हून अधिक झोपडपट्ट्या जळून खाक झाल्याची माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन डझनहून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग लागल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. लोक घाईघाईने झोपडपट्टीतून सामान बाहेर काढण्यात गुंतले होते. मिळालेल्या माहितीनुसार, अद्याप कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. (हेही वाचा - Odisha Train Accident: रेल्वे अपघात कसे टाळता येऊ शकतात? भारत 'या' देशांकडून प्रगत तंत्रज्ञान प्रणाली अवगत करू शकतो; काय आहे रेल्वे अपघात रोखण्याचं तंत्रज्ञान? जाणून घ्या)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)