Accident On Yamuna Expressway: यमुना एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; दोन बसच्या धडकेत 40 प्रवासी जखमी, (Watch Video)

यमुना एक्स्प्रेस वेवर पहाटे तीनच्या सुमारास दोन बसमध्ये भीषण टक्कर झाली. या अपघातात एकूण 40 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाने जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

Accident On Yamuna Expressway: यमुना एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; दोन बसच्या धडकेत 40 प्रवासी जखमी, (Watch Video)
Accident On Yamuna Expressway (PC - X/@PTI_News)

Accident On Yamuna Expressway: उत्तर प्रदेशचा यमुना एक्सप्रेस वे गेल्या अनेक दिवसांपासून अपघातांच्या चर्चेत आहे. सोमवारी येथे पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. यमुना एक्स्प्रेस वेवर पहाटे तीनच्या सुमारास दोन बसमध्ये भीषण टक्कर झाली. या अपघातात एकूण 40 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाने जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मिळालेल्या माहितीनुसार, यमुना एक्स्प्रेस वेवर मथुराजवळील माईल स्टोन 110 राया कट येथे पहाटे तीन वाजता दोन बस एकमेकांवर आदळल्या. या अपघातात 40 जण जखमी झाले असून त्यापैकी 31 जखमींना जिल्हा रुग्णालयात तर 9 जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा - Cylinder Explosion In Pune: सिलिंडरच्या स्फोटामुळे मार्केट यार्डातील झोपडपट्टीला भीषण आग; पहा व्हिडिओ )

पहा व्हिडिओ - 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 15, 2024 10:24 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).