ICSE 12वी इयत्तेत 98.75% गुण मिळवून Rakshita Lohani अव्वल

रक्षिता लोहानी या विद्यार्थिीनीने इयत्ता 12 वीच्या सीआयएससीई बोर्ड परीक्षेत तब्बल 98.75% गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे. रक्षिता ही मुळची उत्तर प्रदेश राज्यातील लखनऊ येथील आहे. सीएसआयएसई बोर्डाने सोमवारी जाहीर केलेल्या निकालादरम्यान ही माहिती पुढे आली.

Rakshita Lohani |

रक्षिता लोहानी या विद्यार्थिीनीने इयत्ता 12 वीच्या सीआयएससीई बोर्ड परीक्षेत तब्बल 98.75% गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे. रक्षिता ही मुळची उत्तर प्रदेश राज्यातील लखनऊ येथील आहे. सीएसआयएसई बोर्डाने सोमवारी जाहीर केलेल्या निकालादरम्यान ही माहिती पुढे आली. विशेष म्हणजे बोर्डाने या वेळी अवघ्या एक महिन्यामध्येच निकाल जारी केला आहे. आजवरच्या 25 वर्षांच्या इतिहासामध्ये इतक्या कमी वेळात निकाल जाहीर करण्याची बोर्डाची ही पहिलीच वेळ आहे.

दरम्यान, लखनऊ येथील जयपुरिया स्कूलची विद्यार्थिनी श्रेया द्विवेदी आणि प्रियंवदा सिंह यांनी टॉपर होण्याचा मान मिळवला आहे. दोन्ही विद्यार्थिनींना 99.25% गुण प्राप्त झाले आहेत. तर, कानपूर येथील द चिंटल्स स्कूलची प्रतिष्ठा सचान हिस 99% गुण मिळाले आहेत. (हेही वाचा, NEET-UG 2024 Paper Leaked? : नीट परीक्षेचा पेपर फूटल्याच्या वृत्ताचा National Testing Agency कडून इन्कार; पहा खुलासा)

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now