NEET-UG Final Results: एनटीए दोन दिवसांत जाहीर करेल नीट-युजी 2024 चा अंतिम निकाल; मंत्री Dharmendra Pradhan यांची माहिती
ती समिती व्यवस्थित काम करत आहे. त्यांनी अनेक मॉडेल्स सुचवले आहेत.
NEET-UG Final Results: नीट-युजी 2024 (NEET-UG 2024) च्या अनुत्तीर्ण उमेदवारांना मोठा धक्का देत, सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी वादग्रस्त परीक्षा रद्द करून परीक्षा पुन्हा आयोजित करण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या. सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, रेकॉर्डवर असा कोणताही पुरावा नाही ज्यावरून असा निष्कर्ष काढता येईल की परीक्षेच्या पावित्र्याचे ‘पद्धतशीर उल्लंघन’ केल्यामुळे ती ‘दूषित’ झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे केंद्र सरकारनेही स्वागत केले आहे. आपले सरकार सर्वोच्च न्यायालयाचे आभारी असल्याचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. यासह केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जाहीर केले की, एनटीए दोन दिवसांत नीट-युजीचा अंतिम निकाल जाहीर करेल. नवीन गुणवत्ता यादी जास्तीत जास्त दोन दिवसांत येईल. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी असेही सांगितले की, त्यांनी एनटीए सुधारण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. ती समिती व्यवस्थित काम करत आहे. त्यांनी अनेक मॉडेल्स सुचवले आहेत. (हेही वाचा: NEET-UG 2024 पुन्हा परिक्षा घेण्याचे आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)