Maharashtra SSC, HSC Exam 2024 Dates: राज्यातील दहावी आणि बारावीच्या अंतिम परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या तारखा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुढील वर्षी होणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
राज्यातील दहावी आणि बाराचीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुढील वर्षी होणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. अहवालानुसार, बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 ते 19 मार्च 2024 होणार आहे. दहावीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 दरम्यान होणर आहे. सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर दिनांक 2 नोव्हेंबर 2023 पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशाप्रकारे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळाकडून दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र मंडळाने दिलेल्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी, अशी माहिती मंडळाने दिली आहे. (हेही वाचा: GCC TBC Computer Typing Exam: जीसीसी टीबीसी संगणकीय टंकलेखन परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू, जाणून घ्या सविस्तर)