Maharashtra School Reopening: 1 डिसेंबरपासून सुरु होणार इयत्ता पहिलीपासूनचे वर्ग; शासनाने जारी केली मार्गदर्शक तत्वे
शाळांनी शिफ्ट/पर्यायी दिवसांमध्ये काम करावे. ठराविक वेळेत केवळ 15-20 विद्यार्थीच वर्गात उपस्थित राहतील याची खात्री करावी
राज्यात 1 डिसेंबर रोजी इयत्ता 1 पासूनचे वर्ग सुरु होत आहेत. महामारीच्या काळात सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी समान प्रवेश मिळावा यासाठी शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार केला जात असल्याचे, शिक्षण मंत्रे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. या शाळा सुरु होताना काही निर्बंधांचे पालन करावे लागणार आहे. त्यानुसार, मुलांसाठी मास्कचा वापर अनिवार्य असेल. कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी, शिक्षक/कर्मचाऱ्यांना लसीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. केवळ पूर्ण लसीकरण झालेल्या कर्मचाऱ्यांनाच आवारात परवानगी असेल. शाळांनी शिफ्ट/पर्यायी दिवसांमध्ये काम करावे. ठराविक वेळेत केवळ 15-20 विद्यार्थीच वर्गात उपस्थित राहतील याची खात्री करावी. प्रत्येक बेंचवर एकच विद्यार्थी बसेल. शाळेची वेळ दररोज 3-4 तासांपर्यंत मर्यादित असावी. शाळांमध्ये कोणत्याही सांस्कृतिक किंवा क्रीडा कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)