Maharashtra Board SSC 10th Result 2024: धाकधूक वाढली! 27 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार दहावीचा निकाल, mahresult.nic.in वर पाहू शकाल

निकाल जाहीर केल्यानंतर, विद्यार्थ्यांची मार्कशीट DigiLocker पोर्टल, digilocker.gov.in आणि त्याच्या मोबाइल ॲप्लिकेशनवर उपलब्ध करून दिली जाईल. विद्यार्थी त्यांचा आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांकाद्वारे लॉग इन करून निकाल तपासू शकतील.

Students (प्रातिनिधिक प्रतिमा)

Maharashtra Board SSC 10th Result 2024: महाराष्ट्र बोर्ड 10वीची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उद्या मोठा दिवस आहे. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MBSHSE) उद्या म्हणजेच, 27 मे रोजी दहावीचा निकाल जाहीर करणार आहे. अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल 27 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. 2024 च्या इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. निकाल जाहीर केल्यानंतर, विद्यार्थ्यांची मार्कशीट DigiLocker पोर्टल, digilocker.gov.in आणि त्याच्या मोबाइल ॲप्लिकेशनवर उपलब्ध करून दिली जाईल. विद्यार्थी त्यांचा आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांकाद्वारे लॉग इन करून निकाल तपासू शकतील. यावर्षी महाराष्ट्र बोर्डाची 10वीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 या कालावधीत झाली होती, ज्यामध्ये सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. (हेही वाचा: Maharashtra HSC Supplementary Exam: बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीचे अर्ज 27 मे पासून ऑनलाईन पद्धतीने भरता येणार; जाणून घ्या महत्वाच्या तारखा)

पहा पोस्ट- 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement