JEE Main 2024 Session 2 Result: जेईई मेन 2024 सत्र 2 परीक्षेचा निकाल जाहीर; jeemain.nta.ac.in वर पाहू शकाल, जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया
जेईई मेन 2024 सत्र 2 परीक्षेत बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल पाहू शकतात व डाउनलोड करू शकतात.
JEE Main 2024 Session 2 Result: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईई मेन 2024 सत्र 2 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर करण्यात आला आहे. जेईई मेन 2024 सत्र 2 परीक्षेत बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल पाहू शकतात व डाउनलोड करू शकतात. उमेदवार खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून किंवा डायरेक्ट लिंकवरून निकाल पाहू शकतात.
थेट लिंक- https://jeemain.nta.ac.in/
जाणून घ्या जेईई मुख्य 2024 सत्र 2 निकाल कसा पाहाल-
- सर्वप्रथम NTA- jeemain.nta.ac.in च्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या.
- यानंतर, होमपेजवर JEE Main 2024 निकाल टॅबवर क्लिक करा.
- त्यानंतर लॉगिन विंडोवर पुनर्निर्देशित केले जाईल, जिथे तुम्हाला तुमची क्रेडेन्शियल्स टाकावी लागतील आणि 'सबमिट' वर क्लिक करावे लागेल.
- यानंतर जेईई मेन 2024 सत्र 2 चा निकाल स्क्रीनवर दिसेल.
- यानंतर निकाल डाउनलोड करा.
- शेवटी भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या. (हेही वाचा: Group-C Services Combined Examination-2023: महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षेतुल उमेदवार गुणवत्तेवरच पात्र- एमपीएससी)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)