20 Universities Declared Fake: UGC कडून देशातील 20 विद्यापीठे 'बनावट' म्हणून घोषित; पदवी प्रदान करण्याचा अधिकार नाही, दिल्लीत सर्वाधिक
दिल्लीत अशी आठ 'बनावट' विद्यापीठे आहेत.’ उत्तर प्रदेशात अशी चार विद्यापीठे आहेत,
विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) बुधवारी 20 विद्यापीठांना ‘बनावट’ म्हणून घोषित केले. यामध्ये दिल्ली सर्वोच्च आहे, जिथे आठ संस्थांणा कोणतीही पदवी प्रदान करण्याचा अधिकार नाही. युजीसी सचिव मनीष जोशी यांनी सांगितले की, ‘अनेक संस्था युजीसी कायद्याच्या तरतुदींच्या विरोधात पदवी देत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा विद्यापीठांद्वारे प्रदान केलेल्या पदव्या उच्च शिक्षण किंवा रोजगाराच्या उद्देशाने मान्यताप्राप्त किंवा वैध नसतील. या विद्यापीठांना कोणतीही पदवी प्रदान करण्याचा अधिकार नाही. दिल्लीत अशी आठ 'बनावट' विद्यापीठे आहेत.’ उत्तर प्रदेशात अशी चार विद्यापीठे आहेत, तर कर्नाटक, महाराष्ट्र, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि केरळमध्येही अशी ‘बनावट’ विद्यापीठे आहेत, असे यूजीसीने म्हटले आहे. (हेही वाचा: ‘बार्टी’मार्फत 300 उमेदवारांना दिल्ली येथे मोफत यूपीएससी पूर्वतयारी प्रशिक्षण; 14 ऑगस्टपर्यंत करू शकता अर्ज, जाणून घ्या पात्रता)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)