Earthquake: काश्मीरमध्ये 5.4 रिश्टर स्केलचा भूकंप, दिल्ली-एनसीआर, उत्तर भारतात जाणवले धक्के
या भूकंपाच्या धक्क्यांमुळे काश्मिरमधील नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पहायला मिळाले, अनेक नागरिकांनी घराबाहेर येत मोकळ्या परिसरात धाव घेतल्याचे दिसून आले,
मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास पूर्व काश्मीरमध्ये 5.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला, असे युरोपीयन भूमध्य भूकंप विज्ञान केंद्राने (EMSC) सांगितले. प्राथमिक अहवालानुसार हा भूकंप जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील गंडोह भालेसा गावापासून 18 किमी अंतरावर 30 किमी अंतरावर झाला. जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि त्याच्या लगतच्या भागांसह उत्तर भारताच्या इतर भागातही हादरा जाणवला.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)