Dhirendra Shastri Controversial Statement on Women: 'महिलेच्या गळ्यात मंगळसूत्र आणि सिंदूर दिसला नाही तर प्लॉट रिकामा...'; धीरेंद्र शास्त्री यांचे महिलांसंदर्भात पुन्हा वादग्रस्त विधान, Watch Video

या व्हिडिओमध्ये बागेश्वर बाबा पुढे म्हणतात, 'आणि भांगामध्ये सिंदूर भरलेला व गळ्यात मंगळसूत्र लटकले तर रजिस्ट्री झाल्याचे दुरूनच दिसते.'

Dhirendra Shastri (PC - Twitter)

Dhirendra Shastri Controversial Statement on Women: भोंदू की चमत्कारी या वादात अडकलेले बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री पुन्हा नव्या वादात सापडले आहेत. सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. प्रवचनादरम्यान धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलं आहे की, 'स्त्री विवाहित असेल तर तिच्या दोन ओळख असतात. पहिली म्हणजे तिच्या भांगात सिंदूर असतो. आणि दुसरी म्हणजे तिच्या गळ्यात मंगळसूत्र असते. ज्या महिलेच्या गळ्यात मंगळसूत्र नसते तो प्लॉट रिकामा आहे, असं समजावं. ग्रेटर नोएडा येथील कथेदरम्यान धीरेंद्र शास्त्री यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या व्हिडिओमध्ये बागेश्वर बाबा पुढे म्हणतात, 'आणि भांगामध्ये सिंदूर भरलेला व गळ्यात मंगळसूत्र लटकले तर रजिस्ट्री झाल्याचे दुरूनच दिसते.' प्रवचन ऐकणाऱ्या अनेक महिला टाळ्या वाजवतात आणि जोरजोरात हसत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे, परंतु आता काही हिंदू महिला त्यावर आक्षेप घेतला आहे. (हेही वाचा - Couple Gets Married in Heavy Rain: मुसळधार पावसात व्हिडिओ कॉलवर जोडपे अडकले लग्नाच्या बेडीत)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)