Delhi Shocker: दिल्लीतील दोन बाईकच्या धडकेत निर्मात्याचा मृत्यू, 1 जण गंभीर, गुन्हा दाखल (Watch Video)

दिल्लीत एका मोटारसायकल अपघातात एका ३० वर्षीय फ्रीलान्स फोटोग्राफर आणि निर्मात्याचा मृत्यू झाला आहे.

delhi Shocker Accident

Delhi Shocker: दिल्लीत एका मोटारसायकल अपघातात एका 30 वर्षीय फ्रीलान्स फोटोग्राफर आणि निर्मात्याचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात एकजण जखमी झाला आहे. पीयूष पाल असं अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो कालकाजी येथील रहिवासी होता. ही घटना 28 ऑक्टोबर रोजी  10 वाजता हा अपघात झाल्याची माहिती मिळाली. पोलिस ठाण्यात या अपघाताची माहिती देण्यात आली. अपघात झाल्यानंतर लगेच जखमींना रुग्णालयता दाखल करण्यात आले. जखमींपैकी एकाला पीएसआरआय हॉस्पिटलमध्ये आणि दुसऱ्याला ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले, पोलिसांनी या अपघाताची कंबर कसून चौकशी सुरु केली आहे. सीसीटीव्ही फुटेज द्वारा बाईक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement