National Sports Day 2024: नागरिकांनी किमान एक तास मैदानी खेळांमध्ये सहभागी व्हावे; राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांचे आवाहन

डॉ. मनसुख मांडविया यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सर्व नागरिकांना किमान एक तास मैदानी खेळांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Union Minister Mansukh Mandaviya (फोटो सौजन्य - X/@ddsahyadrinews)

National Sports Day 2024: केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि कामगार व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त (National Sports Day 2024) सर्व नागरिकांना किमान एक तास मैदानी खेळांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या 'खेलेगा इंडिया, खिलेगा इंडिया' या घोषणेने प्रेरित होऊन डॉ. मांडविया म्हणाले, 'पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न भारताला एक तंदुरुस्त राष्ट्र बनवण्याचे आहे. फिट इंडिया चळवळीची त्यांची दृष्टी प्रत्येक नागरिकासाठी एक कार्यक्रम आहे. मी या वर्षीच्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त या देशव्यापी उत्सवात सहभागी होण्यासाठी तुम्हा सर्वांना आमंत्रित करतो.'

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांचे नागरिकांना आवाहन -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now