Kerala: मोबाईल वापरण्यास मनाई केल्याने मुलाने केली जन्मदात्या आईची हत्या, आरोपी मुलाला अटक
शनिवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. महिलेचा मुलगा सुजित याला मोबाईलचे व्यसन आहे, यामुळे आईने त्याला शिवीगाळ केली असता मुलगा इतका संतापला की त्याने आईवर अमानुष हल्ला केला, तिचे डोके पकडून भिंतीवर आदळले.
Kerala: मोबाईल वापरण्यास नकार दिल्याने मुलाने आईची हत्या केली. ही हृदयद्रावक घटना केरळमध्ये घडली असून, मोबाईलचे व्यसन लागलेल्या एका मुलाने आईच्या दटावणीवर एवढे भयानक पाऊल उचलले. मिळालेल्या माहितीनुसार, कन्नूर जिल्ह्यातील कनिचिरा येथे राहणाऱ्या ६३ वर्षीय महिलेला रुग्मिणी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. रुग्मिनीवर गेल्या आठवडाभरापासून रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. महिलेचा मुलगा सुजित याला मोबाईलचे व्यसन आहे, यामुळे आईने त्याला शिवीगाळ केली असता मुलगा इतका संतापला की त्याने आईवर अमानुष हल्ला केला, तिचे डोके पकडून भिंतीवर आदळले. यात महिला गंभीर जखमी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि सुमारे एक आठवड्यानंतर तिचा मृत्यू झाला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)