Stage Breaks Down Video: राहुल गांधी यांच्या निलंबनाविरोधात काँग्रेसची घोषणाबाजी, आयोजित सभेदरम्यान स्टेज कोसळले; व्हिडिओ व्हायरल

मशाल रॅलीच्या शेवटी प्रदेशाध्यक्ष मोहन मरकाम काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.त्याचवेळी स्टेज कोसळला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Chhattisgarh Stage breaks down

Stage Breaks Down Video:  छत्तीसगडमधील (Chhattisgarh) बिलासपूरमध्ये (Bilaspur.) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या लोकसभेतून निलंबनाच्या निषेधार्थ काँग्रेसने मशाल रॅलीचे आयोजन केले होते.रॅलीदरम्यान पक्षाचे काही नेते एका मंचावर उभे राहून लोकांना संबोधित करत असताना स्टेज तुटला. या अपघातात काही नेत्यांना दुखापतही झाली आहे. गांधी चौकातून निघालेली मशाल रॅली शहरातील प्रमुख मार्गाने देवकीनंदन चौकात आली. मशाल रॅलीच्या शेवटी प्रदेशाध्यक्ष मोहन मरकाम काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.त्याचवेळी स्टेज कोसळला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now