Chennai Cyclone News: कनाथूर भागात मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली, घटनेत दोघांचा मृत्यू, 1 जखमी

तमिळनाडू राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस पडत आहे. राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाने कहर केला असून चेन्नईत पुरपरिस्थिती झाली आहे.

Chennai Cyclone

Chennai Cyclone News: तमिळनाडू राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस पडत आहे. राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाने कहर केला असून चेन्नईत पुरपरिस्थिती झाली आहे. चेन्नईच्या ईस्ट कोस्टल रोड येथील कनाथूर परिसरात आज सकाळी नव्याने बांधलेली भिंत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृत झारखंडचे रहिवासी होते. कनाथूर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. चेन्नईच्या अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होताना दिसत आहे. चेन्नईमध्ये मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले असून शहरातील काही भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement