Punjab Accident: लुधियाणामध्ये 100 वाहने एकमेकांना धडकल्या, भीषण अपघातात एकाच मृत्यू
लुधियाणामध्ये एकाचवेळी 100 वाहने एकमेकांना धडकल्याने भीषण अपघात झाला आहे.
Punjab Accident: पंजाबमध्ये एक सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. लुधियाणामध्ये एकाचवेळी १०० वाहने एकमेकांना धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. माहितीनुसार हा अपघात धुक्यांमुळे झाला आहे. धुक्यामुळे वाहने एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला. पंजाबमधील खन्ना येथे सकाळी ही घटना घडली. या घटनेत एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अमृतसर - दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला आहे. अपघातात अनेक जण जखमी झाले आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयता दाखल करण्यात आले आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार १२ जण गंभीर जखमी झाले आहे. तर एकाच जागीच मृत्यू झाल आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)