Tamilnadu Bus Accident: तामिळनाडूत बस उलटल्याने भीषण अपघात, 15 प्रवाशी जखमी; बचाव कार्य सुरु

उलंदूरपेठजवळ जात असताना बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस उलटली.

tamilnadu bus Overturn PC TWITTER

Tamilnadu Bus Accident: तामिळनाडूतील कल्लाकुरिची जिल्ह्यातील उलुंदुरपेटजवळ सर्वोपचार बस उलटल्याने 15 प्रवासी जखमी झाले आहे. उलंदूरपेठजवळ जात असताना बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस उलटली. या अपघातात 15 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर  उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मदत आणि बचावकार्य सुरू केले. क्रेनच्या सहाय्याने उलटलेली बस सरळ करून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. (हेही वाचा- कुकी अतिरेक्यांचा मणिपूरमध्ये CRPF बटालियनवर हल्ला; दोन जवान शहीद)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)