Rajasthan Accident: शाहपूरा येथे बसची ट्रकला धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

जयपूर शहरातील शाहपूरा भागात सोमवारी पहाटे राजस्थान रोडवेजच्या बसने ट्रकला धडक दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या अपघातानंतर रस्त्यावर एकच खळबळ उडाली आहे.

Accident PC PIXABAY

Rajasthan  Accident: जयपूर शहरातील शाहपूरा भागात सोमवारी पहाटे राजस्थान रोडवेजच्या बसने ट्रकला धडक दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या अपघातानंतर रस्त्यावर एकच खळबळ उडाली आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 20 जण जखमी झाले आहेत. विजय अग्रावल आणि त्यांचीय पत्नी टीना अग्रवाल सोबत त्यांचा मुलगा प्रीतम अशी मृतांची नावे आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, वाहनांचे अक्षरश: चुरडा झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जयपूर दिल्ली महामार्गावर बस ट्रलका ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना हा अपघात झाला. (हेही वाचा- चिपळूण येथे उड्डाणपुलाच्या कामादरम्यान मोठा आपघात; खांब तोडताना रोप तुटला अन् तीन कामगार थेट…(Watch Video)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now