Bribe News: पोलिसांनी तलाठ्याला पाच हजाराची लाच घेताना रंगेहात पकडलं, अन् पुढे जे घडलं (Watch Viedo)

तलाठी दाराने तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच घेतली आणि त्यांने पोलिसांच्या समोर सर्व रक्कम गिळून टाकली.

bribe crime: ( Photo credit- FILE IMAGE)

Bribe News: मध्य प्रदेशातील कटनी येथे तलाठी एका तक्रारदाराकडून लाच घेताना रंगेहात पोलिसांच्या हाती आला आहे. पाच हजार रुपयांची लाच घेताना तलाठीदार पोलिसांच्या नजरेत आला. लाच घेताना पकडण्यासाठी पोलिसांनी कट रचला हे समजताच, तलाठ्याने लाच घेतलेले पैसे गिळले. जवळच्या रुग्णालयात नेले.  डॉक्टरांनी त्यांनी गिळलेले  रक्कम बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. मात्रा त्यांना यश आले नाही.

तलाठी गजेंद्र सिंह याने त्यांच्या खासगी कार्यालयात पाच हजार रुपयांची लाच घेतली.  अशी माहिती  एसपीई एसपी संजय साहू यांनी दिली. परंतु लाच घेतल्यानंतर त्यांना लोकायुक्त विशेष पोलीस आस्थापनेने (एसपीई) कट रचल्याचे लक्षात आले. हा प्रकार लक्षात येताच तलाठी गजेंद्र याने काहीच विचार न करता लाचेची सर्व रक्कम खावून टाकली. हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तक्रारदाराने आपली तक्रार तलाठ्याकडे मांडली. तेव्हा तलाठी दाराने पाच हजार रुपये मागितले.  कार्यलयात पाच हजार रुपये घेत असताना तलाठीला पोलिसांनी रंगेहात पकडले. मात्र सर्व रक्कम त्यांनी गिळून टाकली.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now