Murder Caught on Camera in Gurugram: भररस्त्यात गोळी झाडून बाऊन्सची केली हत्या, दोघांवर गुन्हा दाखल

गुरुग्राम येथे धक्कादायक घटना घडली आहे. उल्लहवास गावात एका २७ वर्षीय बाऊन्सरची हत्या केली. दोन हल्लेखोरांनी भररस्त्यात रात्रीच्या वेळीस गोळीबार केला आणि गोळाबारात त्याची हत्या केली.

Murder Caught on Camera in Gurugram: भररस्त्यात गोळी झाडून बाऊन्सची केली हत्या, दोघांवर गुन्हा दाखल
Firing | Representational image (Photo Credits: pixabay)

Murder Caught on Camera in Gurugram: गुरुग्राम येथे धक्कादायक घटना घडली आहे. उल्लहवास गावात एका 27 वर्षीय बाऊन्सरची हत्या केली. दोन हल्लेखोरांनी भररस्त्यात रात्रीच्या वेळीस गोळीबार केला आणि गोळाबारात त्याची हत्या केली. हल्लेखोर झोमॅटो आणि बिंल्कीट या कंपनीचे गणवेश परिधान करून आले होते. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी दाखल झाले. अनुज असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. अनूजच्या हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस या प्रकरणी चौकशी आणि तपासणी करत आहे. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. गोळीबारच्या घटनेनंतर अनुजला जवळच्या रुग्णलायात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.  ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा- पुण्यात वाहनांची तोडफोड, परिसरात दहशतीचे वातावरण, घटना CCTV कैद)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 29, 2024 04:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).