Bengaluru Accident Video: बीएमटीसी बसच्या धडकेने एकाचा मृत्यू, मन विचलित करणारा Video आला समोर

बेंगळूरूमध्ये बीएमटीसी बसच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Bengluru Accident PC TWITTER

 Bengaluru Accident Video: बेंगळूरूमध्ये बीएमटीसी बसच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बस भरधाव वेगाने समोर जात होती. दरम्यान एक व्यक्ती रस्ता ओलांडत होता परंतु बस न थांबता त्या व्यक्तीच्या अंगावरून धावली. ही घटना कामाक्षीपल्य परिसरात सायंकाळी 7.15 च्या सुमारास घडली. बस केम्पेगौडा स्थानकावरून निघाली होती काहीअंतरावर येताच अपघात घडून आला. चेतन असे मृताचे नाव आहे. बसचे चाक त्याच्या अंगावरून गेले. तो गंभीर जखमी झाला, त्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी बस चालकविरोधात तक्रार नोंदवला आहे. बस चालकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू होता. (हेही वाचा- एपीएमसी मार्केटच्या गोडाऊनमध्ये साफ सफाई करताना महिलेच्या अंगावर कोसळली गोण्यांची थप्पी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now