Blast in Bihar: बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यात पडक्या घरात ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट; सहा मुले जखमी (Watch)
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, नवकोठी पोलीस स्टेशन हद्दीतील पहसरा येथे एका पडक्या घरात हा स्फोट झाला.
बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातील नवकोठी पोलीस स्टेशन परिसरात मंगळवारी एका पडक्या घरात बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये सहा मुले जखमी झाली आहेत. सर्व जखमी मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, नवकोठी पोलीस स्टेशन हद्दीतील पहसरा येथे एका पडक्या घरात हा स्फोट झाला. घराजवळ काही मुले खेळत होती, त्याच दरम्यान त्यांचा चेंडू त्या घरात गेला. ही सर्व मुले बॉल शोधण्यासाठी घरी पोहोचली त्यावेळी मुलांना घरात एक बॉक्स सापडला. मुलांनी हा बॉक्स उघडताच त्याचा स्फोट केला. बेगुसरायचे पोलीस अधीक्षक योगेंद्र कुमार यांनी सांगितले की, स्फोटात 6 मुले जखमी झाली असून त्यापैकी चार मुले गंभीर जखमी आहेत. सर्व जखमी मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर एफएसएल टीमला पाचारण करण्यात आले आहे. बॉम्ब इथपर्यंत कसा पोहोचला याचा शोध पोलीस घेत आहेत. (हेही वाचा: Karnataka Abortion Racket: कर्नाटकमध्ये तब्बल 3000 स्त्रीभ्रूण हत्या; गर्भपात रॅकेट तपासात झाले धक्कादायक खुलासे)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)