Bihar: पाटणामध्ये धक्कादायक घटना, कोचिंगवरून घरी परतणाऱ्या मुलीवर झाडली गोळी (Watch Video)

मिळालेल्या माहितीनुसार, बेऊर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रपुरी मोहल्ला येथून कोचिंगचा अभ्यास करून विद्यार्थी घरी परतत असताना, त्याचवेळी ही घटना घडली.

Photo Credit - Twitter

पाटणातील बेऊर पोलीस स्टेशन हद्दीतील सिपारा भागातील इंद्रापुरी परिसरात बुधवारी एका भाजी विक्रेत्याच्या मुलीवर गोळी झाडली. गळ्यात गोळी लागल्याने जखमी झालेल्या मुलीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे प्रकरण प्रेमप्रकरणातून असल्याचे पटना पोलिसांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, बेऊर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रपुरी मोहल्ला येथून कोचिंगचा अभ्यास करून विद्यार्थी घरी परतत असताना, त्याचवेळी ही घटना घडली. मुलीच्या मानेवर गोळी लागली, त्यानंतर तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. एएनआय या वृत्तसंस्थेनेही या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement