केंद्र सरकारकडून ED आणि CBI प्रमुखांचा कार्यकाळ 5 वर्षांपर्यंत वाढवण्याचा मोठा निर्णय

सध्या देशात CBIचे प्रमुख सुबोध जैस्वाल आणि EDचे प्रमुख संजय कुमार मिश्रा आहेत.

PM Narendra Modi | (Photo Credits: Twitter/ANI

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्वाखालील केंद्र सरकारने CBI आणि ED संचालनालयाच्या प्रमुखांचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. CBI आणि ED संचालनालयाच्या प्रमुखांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवण्याचा अध्यादेश सरकारने आणला आहे. सध्या दोन्ही केंद्रीय संस्थांच्या प्रमुखांचा कार्यकाळ दोन वर्षांचा होता आता तो तीन वर्षाचा वाढू शकतो. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind) यांनी दोन्ही अध्यादेशांवर स्वाक्षरी केली आहे. सध्या देशात CBIचे प्रमुख सुबोध जैस्वाल आणि EDचे प्रमुख संजय कुमार मिश्रा आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)