Bengaluru Shocker: कॉम्प्लेक्सच्या स्विमिंग पूलमध्ये 9 वर्षाच्या मुलीचा सापडला मृतदेह, पोलिसांचा तपास सुरू, बेंगळुरू येथील घटना

बेंगळुरुच्या टेक कॉरिडॉरमधील वरथूर- गुंजूर रोडजवळील अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या स्विमिंग पूलमध्ये नऊ वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला

Death | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Bengaluru Shocker: बेंगळुरुच्या टेक कॉरिडॉरमधील वरथूर- गुंजूर रोडजवळील अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या स्विमिंग पूलमध्ये नऊ वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला. गुरुवारी या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शुक्रवारी ही घटना घडली आहे. मानया असं मृत मुलीचे नाव होते. पोलिसांनी सांगितले की, मुलगी तिच्या कुटुंबासोबत त्याच अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये राहत होती. तलावाजवळील लाईटच्या खांबाला लटकलेल्या विजेच्या ताराच्या संपर्कात आल्याने मुलगी चुकून स्विमिंग पूलमध्ये पडल्याचा दावा अपार्टमेंट कॉम्प्लेक्समधील रहिवाशांनी केला आहे. मात्र, मृत्यू बुडून झाला की विजेच्या धक्क्याने झाला हे शवविच्छेदनानंतरच समजू शकेल. अहवालाची वाट पाहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement