Bengaluru Rains: Kempegowda International Airport परिसरात मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती; प्रवाशांनी विमानं गाठण्यासाठी घेतली ट्रॅक्टरची मदत (Watch Video)
बेंगलोर मध्ये मुसळधार पावसामुळे एअरपोर्ट परिसरात देखील पाणीच पाणी झालं आहे. सध्या सोशल मीडीयावर Kempegowda International Airport परिसरातील व्हिडिओ शेअर केले जात आहेत.
कर्नाटकात बेंगलोर मधील पावसाचा फटका एअरपोर्टला देखील बसला आहे. आज (11 ऑक्टोबर) विमानतळाकडे जाणारे रस्ते देखील जलमय झाले होते. सध्या Kempegowda International Airport परिसरात पाणीच पाणी साचलं असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. पाण्यातून रस्ता काढत विमानं गाठण्यासाठी काहींनी चक्क ट्रॅक्टरचा पर्याय निवडला आहे. अनेकांनी अशा परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाची काय तयारी आहे? असा संतप्त सवाल विचारला आहे.
ट्रॅक्टरने गाठत आहेत विमानतळ
पाणीच पाणी
बेंगलोर एअरपोर्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)