Good News For Bank Account Holders: ऑनलाइन फसवणुकीत ग्राहकाच्या खात्यातून पैसे गमावल्यास बँकांना पैसे द्यावे लागतील, NCIB ने दिली माहिती

नॅशनल क्राईम इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने अलीकडेच ट्विटरवर एक माहिती शेअर केली आहे. एनसीआयबीने (NCIB) आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, एखाद्याच्या बँक खात्यात जमा केलेल्या रकमेची सुरक्षा ही बँकेची जबाबदारी आहे.

Good News For Bank Account Holders: ऑनलाइन फसवणुकीत ग्राहकाच्या खात्यातून पैसे गमावल्यास बँकांना पैसे द्यावे लागतील, NCIB ने दिली माहिती
Cyber Crime | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या युगात बँक खात्यातील फसवणुकीचे प्रमाणही वाढले आहे. बँक खात्यातून बेकायदेशीर पद्धतीने अनधिकृत व्यवहार होतात. नॅशनल क्राईम इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने अलीकडेच ट्विटरवर एक माहिती शेअर केली आहे. एनसीआयबीने (NCIB) आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, एखाद्याच्या बँक खात्यात जमा केलेल्या रकमेची सुरक्षा ही बँकेची जबाबदारी आहे. जर तुमच्या खात्यातून फसवणुकीने पैसे काढले गेले, तर बँकेला ते परत द्यावे लागतील, असे ट्विटमध्ये म्हटले आहे. एनसीआयबीने म्हटले आहे की, राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या निर्णयानुसार, जर खात्यातून फसवणूक करून पैसे काढले गेले असतील तर त्याला ग्राहक नव्हे तर बँक जबाबदार असेल.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 07, 2022 11:46 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).