Zomato वर दुपारच्या वेळीस ऑर्डर करणे टाळा! कंपनीने केले आवाहन, जाणून घ्या नेमके कारण

देशात उष्णतेची लाट उसळत असल्याने लोकांना उष्मघाताचा त्रास वाढत चालला आहे. अनेक राज्यात तापमानात दिवसेंदिवस वाढत होत आहे. नागरिकांना उष्माघाताचा सामना करावा लागत आहे.

Zomato PC fb

Zomato: देशात उष्णतेची लाट उसळत असल्याने लोकांना उष्मघाताचा त्रास वाढत चालला आहे. अनेक राज्यात तापमानात दिवसेंदिवस वाढत होत आहे. नागरिकांना उष्माघाताचा सामना करावा लागत आहे. अशा भीषण परिस्थितीच झोमॅटो कंपनीने आपल्या ग्राहकांना दुपारी ऑर्डर देणे टाळण्याची विनंती केली आहे. Zomato ने X वर पोस्ट शेअर केली आहे. त्यात असे लिहले आहे की, ''कृपया फार महत्त्वाचे असल्याशिवाय दुपारच्या वेळी ऑर्डर देणे टाळा,'' काही दिवसांपूर्वी उष्णतेच्या लाटेमुळे देशातील 15 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. लोक उष्माघातामुळे त्रस्त झाले आहे. झोमॅटो कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांचा विचार करत आणि डिलिव्हरी बॉईजना होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हे अपील केले आहे. (हेही वाचा- Zomato ने लॉन्च केला 'Large Order Fleet'; एकाच वेळी करता येणार 50 लोकांचे जेवण ऑर्डर)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now