Atul Subhash Suicide Case: अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी पत्नी निकिता आणि सासरच्यांना जामीन मंजूर

अतुल सुभाष यांची पत्नी निकिता सिंघानिया, तिची आई निशा सिंघानिया आणि भाऊ अनुराग सिंघानिया यांनी या प्रकरणात जामिनासाठी बेंगळुरू सिव्हिल कोर्टात धाव घेतली होती.

Atul Subhash's wife Nikita granted bail (फोटो सौजन्य - X/@ShoneeKapoor)

Atul Subhash Suicide Case: बेंगळुरूमधील एआय सॉफ्टवेअर इंजिनिअर अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी न्यायालयाने आरोपी पत्नी निकिता सिंघानिया आणि तिच्या कुटुंबीयांना जामीन मंजूर केला. अतुल सुभाष याने पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांवर छळाचा आरोप करत 9 डिसेंबर रोजी आत्महत्या केली होती. अतुल सुभाष यांची पत्नी निकिता सिंघानिया, तिची आई निशा सिंघानिया आणि भाऊ अनुराग सिंघानिया यांनी या प्रकरणात जामिनासाठी बेंगळुरू सिव्हिल कोर्टात धाव घेतली होती. त्यांनी यापूर्वी कर्नाटक उच्च न्यायालयाला आपला जामीन अर्ज निकाली काढण्यासाठी सत्र न्यायालयाला निर्देश देण्याची विनंती केली होती. उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाला आज याचिका निकाली काढण्याचे निर्देश दिले.

अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी पत्नी निकिता आणि सासरच्यांना जामीन मंजूर -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement