India's first COVID Vaccine for Animals: प्राण्यांसाठी भारतातील पहिली कोविड लस लाँच

ही लस हरियाणास्थित नॅशनल हॉर्स रिसर्च सेंटर (NRCE) ने विकसित केली आहे.

India's first COVID Vaccine for Animals (PC - Twitter)

India's first COVID Vaccine for Animals: केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Union Agriculture Minister Narendra Singh Tomar) यांनी गुरुवारी प्राण्यांसाठी देशातील पहिली कोरोना लस अँकोवॅक्स (Anocovax) लाँच केली. ही लस हरियाणास्थित नॅशनल हॉर्स रिसर्च सेंटर (NRCE) ने विकसित केली आहे. कोरोना लस आणि डायग्नोस्टिक किटच्या आभासी प्रक्षेपणानंतर तोमर म्हणाले की, देशातील शास्त्रज्ञांच्या मेहनतीमुळे आणि योगदानामुळे देशाला बाहेरून लस आयात करण्याची गरज भासली नाही. भारत स्वतःची लस विकसित करून स्वावलंबी झाला आहे, ही देशासाठी मोठी उपलब्धी आहे.

कोरोना लसीव्यतिरिक्त, तोमर यांनी एलिसा, प्राण्यांसाठी अँटीबॉडी किट देखील लॉन्च केले. ते म्हणाले की, प्रतिजन तयार करण्यासाठी प्रयोगशाळेची गरज नाही. हे किट भारतात बनवण्यात आले असून भारत त्याचे पेटंट घेण्याची तयारी करत आहे. यादरम्यान तोमर यांनी घोड्यांसाठी इक्वीन डीएनए चाचणी किटही लाँच केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)