Andra Pradesh Fire: विझाग येथील इंडस हॉस्पिटलमध्ये भीषण आग; रुग्ण अडकले, बचाव कार्य सुरु (Watch video)
विशाखापट्टणमधील इंडस हॉस्पिटलमध्य आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत अनेक रुग्ण आत अडकल्याची माहिती मिळाली आहे.
Andra Pradesh Fire: विशाखापट्टणमधील इंडस हॉस्पिटलमध्य आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत अनेक रुग्ण आत अडकल्याची माहिती मिळाली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत.अग्निशमन दलाचे कर्मचारी, पोलीस आणि इतर बचाव कर्मचारी रुग्णांना बाहेर काढण्यात आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. शहरातील बंदर परिसरात जगदंबा सर्कल येथे असलेल्या रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली आहे. अद्याप ४० रुग्णांना बाहेर काढण्यात आले आहे आणि त्यांना दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले आहे. या घटनेअंतर्गत अधिक तपशील प्रतिक्षेत आहे. शार्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे,पोलिस ठाण्यातील वरिष्ठ कर्मचारी घटनास्थळी पाहणी करण्यासाठी आले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)