Hyderabad Shocker: शिक्षक पेशाला काळीमा फासणारी घटना, पहिलीच्या विद्यार्थींचा लैंगिक छळ, आरोपीला लाथा बुक्कांचा मार (Watch Video)
हैद्राबाद येथील मेडचल बोदुप्पल येथे एक लाजिरवाणी घटना घडली आहे. किरण इंटरनॅशनल स्कूलच्या डान्स टीचरने इयत्ता पहिलीच्या विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचे समोर आले आहे.
Hyderabad Shocker: हैद्राबाद येथील मेडचल बोदुप्पल येथे एक लाजिरवाणी घटना घडली आहे. किरण इंटरनॅशनल स्कूलच्या डान्स टीचरने इयत्ता पहिलीच्या विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर संतप्त कुटुंबियांनी शाळेत जाऊन आरोपी शिक्षकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली आहे. सध्या पोलिसांनी अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी डान्स टीचरला अटक करून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. हैदराबादसारख्या मोठ्या महानगरात अशा घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. (हेही वाचा- शाळा सुटली, शिक्षकांसह वॉचमन घरी गेले, वर्गात राहिला विद्यार्थी; पाहा पुढे काय झाले (Watch Video)